STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Others

4  

.प्रमोद घाटोळ

Others

एक आठवण

एक आठवण

1 min
348

अजूनही आठवतं ते घर 

जिथे गरीबी सुखात नांदत होती

भिंती वरच्या रिकाम्या डब्यात निवांतपणे


डोळ्यासमोर उभी राहते 

मिणमिणत्या दिव्याची चिंधीची वात

जी आसुसलेली असेन मातीच्या तेलासाठी

घडीघडी विझणारी इवलीशी ...


अजूनही आठवते त्या काळचा मित्र

गरीब सुदामा

त्याच्या घरची भली माणसं साधीभोळी

जणू की खऱ्या रक्ताची...


शहरात राहतांना आठवते ती एक रात्र

खेड्यातल्या सोबत्याच्या घरची

माणूसपण जपणारी

कढी कोंड्याच्या येथेच्छ मेजवाणीची

मनाला भुरळ पाडणारी...


आठवते त्या दिवशीचं शितल चांदणं

तेव्हा सारं काही खुजं भासते

त्या आपुलकीच्या समोर

समजायला येतो जीवनाचा अर्थ


Rate this content
Log in