STORYMIRROR

गीता केदारे

Others

3.9  

गीता केदारे

Others

दयाघना दिगंबरा....

दयाघना दिगंबरा....

1 min
3.6K


दुःखच दिलेस दयाघना

दाखव दैवरूपी दाखला

दीनदुबळ्यांच्या दीनदयाळा

दृष्टांत दयाक्षणी दावला....


दगडाचा देव दयार्णव दिगंबरा

देव्हाऱ्यात दर्शनासाठी देह दिधला

दूर दुःखाचे दालन दत्तनामाने

दत्तात्रय देहात, दिंडीत दत्त दणाणला...


देवाचिया द्वारी दास दत्ताचा

दर्पणात दृष्टिकोण दर्शनाचा

देखावा दिनरात दावी देहाचा

देई दिलासा दान देहभानाचा....


देवा देवा दाव दर्शन

देव देही देव दाही दिशांत

दिवसरात्र दिसतो देव

देहरूपी देव्हाऱ्यात....


Rate this content
Log in