STORYMIRROR

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

दवबिंदू

दवबिंदू

1 min
593

होऊनि धुंद

निसर्ग ल्याला आज

दवांचा साज


थेंब दवाचे

चमचम करती

पानांवरती


बिंदू सानुले

दिसतात साजिरे

गोडगोजिरे


दवबिंदू हे

अवखळ ते किती

खेळ खेळिती


टपोरा एक

थेंब बघे दडून

पानाआडून


तृणाचे पाते

पाही खेळ वळून

सळसळून


साहित्याला गुण द्या
लॉग इन