दूधावरची साय
दूधावरची साय

1 min

11.7K
दूधावर आली
खरपूस साय
बघे मनीमाऊ
मिळेल का साय? (1)
हळूहळू गेली
ओट्यावर माऊ
जवळ जाताच
अंग लागे पोळू (2)
बेबीला कळले
माऊला पोळले
जवळ घेतले
औषध लावले (3)
जिभल्या चाटते
का ही मनीमाऊ?
अगं तुला देते
साय अन् दूदू (4)
कोमट दूधाला
बशीत ओतले
साय ढकलली
माऊला पाजले (5)
आजीला कळले
कुठे गेली साय!!
बेबी मिठी मारे
कुठे गेली साय!! (6)