STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

3  

अमोल धों सुर्यवंशी

Others

दुष्काळग्रस्त

दुष्काळग्रस्त

1 min
413

पावसाळा  चालू झालाय

आमच्याकडे पाट फिरवून

ढगांचा काळोख येतोय

विजेचा लखलखाट येतोय

अभाळाची काय?

आम्ही चोरी केली

कि तो आम्हाला विसरतोय


आरे तूझ्या सोनेरी धारांची

वाट बघतोय मी

घळल्या शरीराने हाक

देतोय मी


भेगाळ जमीनवर लाज वाटते

का पडायला

नको तीथे पडतोस ना

जीवित हानी करतोस ना

तू अशील या दुनियेचा राजा

आणून दाखव पुर गावत माझ्या


अश्रू वाहत्य मुख जनावर

वाट पाहत तूझी डोळ झाकून

गुमान ये बरसून जा

नाही बरसलास तर

यांचे दुख पाहून जा

पाहून तू रडशील

आम्हाला वाटेल तू पडशील.....

माहित आहे आम्हा तू सतत

आमच्याकडे पाट फिरवशील


Rate this content
Log in