दुष्काळाशी लढू
दुष्काळाशी लढू
सगळीकडे पडला दुष्काळ
कोरडं पडलं शेत
मनात उठलंय काहूर
देवा जोडतोय हात
दूर कर दुष्काळ
होऊदे आबादानी
मी शेतकरी बापडा
आस तुझीच रे रात्रंदिनी
बा विठ्ठला मायबाप
पोटी घाल अपराध सारे
येऊदे बरसून थेंब
नि दुःख सरू दे सारे
मागल्या वेळी ओल्या दुष्काळाने
नेला माझा बाप
डोळ्यांमध्ये त्याच्या
होती तुझीच रे झाक
आता हा दुष्काळ
टिपं बरसेना
डोळ्यांतून अश्रूंचा
महापूर थांबेना
दुष्काळाची समस्या
आहे जुन्या काळाची
सुटेल ती कधी सांग
शपथ तुला रुक्मिणीची
देवा तूच दाखव मार्ग
आम्ही खचणार नाही
उजाडलं घरदार
तरी रडणार नाही
आहे हिम्मत मनात
साथ आहे तुझी
पुन्हा येऊदे रामराज्य
डोळेभरून पाहू दे सुगी
