दुष्काळ
दुष्काळ
1 min
475
जमिनीला पडल्या भेगा
मनुष्यावर ओरखड्या रेघा ।१।
भूमातेला पाण्याची आस
मिळेल का आपल्याला
पोटभर घास ।२।
पडला आहे दुष्काळ
उगवेल का
सुखाची सकाळ ।३।
गुरढोरं पाण्याविना झुरतं
शेतकरी दुष्काळात मरतं ।४।
कधी संपेल दुष्काळाचे मास
निघेल शेतक~याच्या गळ्याला फास ।५।
उभारले पीक दिसे शेतात
अवकाळी पावसाने केला हो घात ।६।
ओल्या सुक्या दुष्काळाची
कहाणी ऐकून पाहावी
दुष्काळाचे तांडव
डोळ्यात नाचवी ।७।
दुष्काळाचे पाणी
डोळ्यात साठले घनदाट
सांगा कधी उगवेल
सुखाची सोनेरी पहाट ।८।
