दुष्काळ
दुष्काळ
1 min
328
पाण्याचा हा प्रश्न
उठे सगळीकडे
तरीही माणसा
का रे झाड तोडे
धन दौलतीच्या
मागे सारे पडे
प्रत्येकाच्या डोळी
अश्रूंची ही सडे
बाह्य सौंदर्याने
किती रोज मढे
पाण्याविना बंद
जीवनाचे पाढे
पाण्याविना इथे
सगळ्यांचे अडे
कृषकाचे तर
निघे रोज मडे
पडला दुष्काळ
म्हणून का रडे
एक तरी झाड
तू लाव ना गडे
