दुष्काळ
दुष्काळ
शेत-शिवार आनंदानी डुलले
हिरव्यागार पिकांनी बहरले
बळीराजा हसला समाधानाने
पावसात बघा पीक सारे न्हाले
पण कहरच केला पावसाने
पडण्याचे थांबेना काही केल्याने
दिला दगा भरवशाच्या पावसाने
कुणब्याचे डोळे भरले पाण्याने
आले पीक पाण्यात सारे बुडाले
ओल्या दुष्काळाने आले पीक गेले
गावोगावे पावसाने झोडपले
घरातले सामान वाहून नेले
बुडून गेली हो मुकी जनावरे
उद्ध्वस्त झाली सारी सुखी संसारे
रोगराईचे थैमान चोहिकडे
नावेतून जावे लागे सारीकडे
नको रे पावसा आता थांब अरे
वृक्षतोडच नाही वृक्ष लावू रे
चूक आमची आम्हां माफ कर रे
वृक्षसंवर्धन शपथ घेतो रे
