दुष्काळ एक समस्या
दुष्काळ एक समस्या
1 min
542
काळाची वायिट गती
तोच आहे दुष्काळ
सुखाला लागते नजर
येतो दुःखद काळ
भोवऱ्यात फसतो
सगळा जनपसारा
कावरा बावरा होतो
प्राणीमात्राचा जीव बिचारा
भकास होते जीवन
विराम मिळतो अपेक्षांना
लय पावते जीवनचक्र
आधार ना उरतो जीवांना
ओला,सुखा दुष्काळ
सत्वपरीक्षाच खरी
प्रश्न उरतो भविष्यकाळ
संकट कोसळते आभाळापरी
मोडकळीस पडतो संसार
हालअपेष्टानाचे जिने नशिबी
हाथ द्यावा मदतीचा
हाक देते गरिबी
साकडे हे परमेश्वराला
नको हे दिवस पुन्हा
राखूया समतोल विश्वाचा
नको घडाया हातून गुन्हा
करूया व्रुक्षारोपण
ठेवूया निर्मळ परिसर
जपूया माणुसकीची जान
मानून देवाचे आभार
