STORYMIRROR

SHUBHAM KESARKAR

Others

3  

SHUBHAM KESARKAR

Others

दुर्लक्ष

दुर्लक्ष

1 min
12.2K

ओरडून आम्ही थकलो आता

दुर्लक्ष तुम्ही करत आहात

तुमच्यामुळे दुसऱ्यांचे घर

का उध्वस्त करत आहात !! धृ !!


अहो समजवले तर ही

लहान मुलं ही समजून घेतात

तुम्ही तर मोठे आहात ना

मग पुन्हा त्या चूका का करत आहात !! १ !!


संख्या ही वाढत आहे 

पण तुमची खरेदी बाकी आहे

वेळेचे हे भान ठेवाना हो

ह्यानंतर तुमचेच राज्य आहे !! २ !!


बोलावेसे वाटत नाही

पण बोलायला तुम्ही करता

छोट्या छोट्या कारणांनी

रुग्ण तुम्ही वाढवतात !! ३ !!


स्वतःचा विचार करू नका

देशाचे भवितव्य जपा

संकटाची वेळ आहे फक्त

थोड्यावेळ घरीच बसा !! ४ !!


समजुतीने वागा तुम्ही

सर्व काही सोपे होईल

गर्दी टाळा आपल्याभोवती

साखळी ही तोडली जाईल !! ५ !!


महत्व तुम्ही जाणता हो

पण ते कार्यात सुद्धा आणा

दुसरा करतो म्हणून आपण करू

ही गोष्ट आधी नष्ट करा !! ६ !!


वैर नाही कोणासोबत पण

बोलणे माझे कर्तव्य आहे

देशाचा जागरूक नागरिक म्हणून

समजवणे माझे आद्यकर्म आहे !! ७ !!


निरोप घेण्यास म्हणतो आता

काळजी घ्या स्वतःची

बाहेरचे जग पाहण्याकरिता

थोडा वेळ बसा आपल्या घराशी !! ८ !!


Rate this content
Log in