दुरावा
दुरावा
1 min
259
असेल दुरावा कितीही अंतर मात्र दिसणार नाही
दिसतील त्या जखमा घाव मात्र उरणार नाही
असा सामना द्वंदि निकाली हरलो जिंकलो कळणार नाही
खेळलो असेल कितीही खेळाडू मात्र उरलो नाही
पळत होतो सोडून सगळे रस्ता फक्त कणखर नाही
प्रवास संपत आला होता शेवट मात्र पुरला नाही
दिसत असला अंत जरी उरी जीव मात्र सरला नाही
सारखे पाहात होतो तुला जाताना आता दुरावाही उरला नाही
