दुनिया शब्दांची
दुनिया शब्दांची
1 min
317
विश्वासाच्या जोरावर, धरली आहे लेखनी.
शब्दांच्या भरवशावर, कागदावर रेखनी.
जोडत आहे भावना प्रश्न, क्रोध आणी प्रतिकार.
सर्व काही मनसोक्त लिहिण्याचा, मला आहे अधिकार.
कधी पटत कधी नाही, सगळ्यांनाच सगळं पटत अस नाही.
शब्द सगळ्यांना तोच सारखा, पचल सगळ्यांनाच अस काही नाही.
आम्ही मात्र मुक्त, काहीही उतरवण्यास तत्पर.
लिखानाचा काही पडेल फरक, एखादा तरी होईल सत्पर.
आवडल तर नक्की घ्या, नाहीतर सोडून द्या.
विचारवाद करणाऱ्यांनो, शब्दांच्या दुनियेत नक्की या.
