दुःखहर्ता बाप्पा
दुःखहर्ता बाप्पा
1 min
148
बघता बघता बाप्पा आले
पण कोरोना काही हटेना
गांभीर्य संपले या रोगाचे
कोरोनाची भीती वाटेना
गणराय सर्वांचा तारणहार
तोच सुखकर्ता नि दुःखहर्ता
एक मागणी करू श्रीगणेशा
कानी पडू दे चांगली वार्ता
घरात बसून सारेच कंटाळले
मानवाचे विघ्न दूर कर आता
किती दिवस सहन करायचे
तूच कर्ता आणि करविता
न भूतो न भविष्यति असे
संकट आले आज सर्वावरी
संसर्गरोग पसरण्याचा भीतीने
जवळ असून दूर आहेत सारी
दरवर्षीसारखा यंदा दिसेना
जोश तुझ्या स्वागतासाठी
घरोघरी पूजा करू आम्ही
सर्वाना समृद्धी शांती मिळो
हीच प्रार्थना वैश्विक सुखासाठी
