दुःख कोरड्या धबधब्याचे
दुःख कोरड्या धबधब्याचे
कधी तुझ्या देखाव्याला
शब्दांनी सजवीले मी
शब्दांचा काजळ तुझ्या
सौंदर्याला लावला मी
धुंद होऊनी जायचो
तुझ्याकडे पहातांना
मुखातून तुझ्या जनु
तू उदक सोडतांना
खळखळणारे जल
कोसळे खडकावरी
जनु खडकाशी झोंबी
कोसळतांना त्यावरी
नाद अनोखा एकच
दुरवर घुमायचा
कोसळतांना उदक
तुषार जन्म घ्यायचा
रम्य तु निसर्ग पुत्र
गारवा तुझा सोबती
रुबाब तुझा लोभस
नजरा तुझ्यावरती
पहाता तुझी अवस्था
शब्द माझी करपली
चित्र कसे बदलले
वेळ ही कोणी आणली
विद्रूप झाला आहे तु
दु:ख वाटते पहाता
ओसाड एकटा तिथे
कसा वाहता वाहता
स्वार्थासाठी मानवाने
केला निसर्गचा घात
अन् निसर्ग पुत्राला
दिलंय कोरडाव्यात ...
