दत्त स्तवन
दत्त स्तवन
1 min
476
दत्तगुरूंचे करता स्मरण।
टळते आपदा आणि मरण।
अनन्यभावे जावे शरण।
दत्तगुरू भवसिंधू तारण॥
दत्त माझा, मी दत्ताची।
ओढ मनाला दत्त भेटीची।
संसार- सागर त्यजून आता।
भेट घडू द्या जीवाशिवाची॥
कैवल्याच्या भेटी घडती।
स्मरता एकच दत्तमूर्ती।
चिंता- क्रोध, षड्रिपू हरती।
दत्तगुरूंच्या चरणावरती॥
मना भासे दत्त, नेत्री वसे दत्त।
कर्णास गोडवा, दिगंबर दत्त।
जीवाला आधार, नुरे खेदखंत।
लाभला जयाला, मंत्र गुरु दत्त ॥
दत्त हा आधार, दत्त जीवनसार।
दत्त लाभे त्याचा, भवसागर पार।
दत्त कृपामूर्ती, असो दत्त चित्ती।
भवभय टळे , दत्त देईल प्रचिती ॥
