दसरा
दसरा
1 min
379
तोरण दारी झेंडूच्या माळा
अंगी सजल्या रंगीत रांगोळ्या।
व्रताची सांगता नेवैद्य पुरणपोळीचा।
कुमारिका सवाष्ण ब्राह्मण जेवणाला।
आपट्याची पाने घेऊन सण दसरा आला।
मनीचे वैर विसरून सारे।
आपट्याची पाने सोन म्हणून घ्यारे।
घेण्या थोर मोठ्यांचे आशिष
सण दसरा हा एक दिवस।
भरला घडा पापाचा नाश
रावण जळाला तो हाच दिवस
तो हाच दिवस
सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा
