STORYMIRROR

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

दसरा

दसरा

1 min
371

वैर जुनाट विसरा आला उत्सव दसरा

भेटा प्रेमाने शत्रूला ठेवा चेहरा हसरा ।।१।।


थोडा ठेऊन बाजूला अहंकार या मनाचा

सीमोल्लंघन कराया नको आग्रह मानाचा ।।२।।


राम अंतरी जागवा जाळा रावण आतला

दुष्ट वृत्तीच्या नाशाचा विडा मनाशी उचला ।।३।।


हृदयाच्या आकाराची पानं द्यावी आपट्याची

जपणूक करावी या सोन्या सारख्या नात्याची ।।४।।


धार लावुनी शस्त्रांना मन बुद्धी तेज करू

शक्ती पूजन करून दैत्य महिषासुर मारू ।।५।।


नित्य करू उपासना पुजू शारदा देवता

दिवा ज्ञानाचा अंतरी ठेऊ अखंड तेवता ।।६।।


दिवस आजचा मोठा उत्साहाचा आनंदाचा

विकारांना दिशा दाखवत विजय प्राप्तीचा ।।७।।


Rate this content
Log in