STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

दशावतार

दशावतार

1 min
230

कोकणच्या संस्कृतीचा वसा 

दशावतार नाट्याने‌ जपला आहे जसा तसा


जत्रा असो वा उत्सव असो असतेे त्याची हजेरी

ते राखतात रसिक प्रेक्षकांची मर्जी


मेकअप असतो भडक वर झुपकेदार मिशा 

पुरुष पात्र ही शोभे स्त्रिया वेशात


रंगमंच साधा पण उठुन‌‌ दिसे

भरजरीत कपडे त्यात पात्र शोभे


संगीताला तबल्याची अन् पेटीची साथ

भारदस्त आवाज घुमे चारही वाट


गणेश वंदनाने सुरू होई प्रयोग

पहाटेपर्यंत चाले हा मनोरंजनाचा याग


साता समुद्रापार ही पोहचली किर्ती ह्या नाट्याची

जत्रेेेला दशावतारी नाट्याशिवाय शोभा नाही


Rate this content
Log in