STORYMIRROR

Pratiksha vaibhav Kulkarni

Others

3  

Pratiksha vaibhav Kulkarni

Others

दृष्टीकोन

दृष्टीकोन

1 min
617

आनंद आणि दुःख दोन छटा जीवनाच्या

त्यातच असतो अर्थ आयुष्य जगण्याच्या

तरीही असे हा खेळ आपल्याच दृष्टिकोनाचा!!

निसर्गाने दुःखाचा ईशारा म्हणून रात्र निवडली

तरीही रात्रीच्या त्या चांदण्यांनी सुखाची चाहूल दिली

रात्रीनंतर येणाऱ्या दिवसाने झोत दिला प्रकाशाचा

असे हा खेळ आपल्याच दृष्टिकोनाचा!!

गरिबी श्रीमंती मोजमाप ठरले वास्तव्याचे

त्याहूनही महत्वाचे आहे मोल मनाच्या श्रीमंतीचे

जगू आनंदे असेल जरी अडथळा परिस्थितीचा

असे हा खेळ आपल्या दृष्टिकोनाचा!!

मनाची श्रीमंती हीच खरी दौलत आयुष्याची

त्याच श्रीमंतीने बांधली जाते गाठ माणुसकीची

छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद मिळे जगण्याचा

असतो हा खेळ आपल्याच दृष्टिकोनाचा!!


Rate this content
Log in