STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

दरमजल

दरमजल

1 min
265

मजल दरमजल करत, पडत असतात पाऊल.

गर्दीतल्या भयाण शांततेची, लागते मग चाहूल.


शून्यापासून सुरवात सगळ्यांची, शेवट आपल्या खेचत राहतो.

विसावा मिळतो सूर्य मावळला की, पहिला प्रहर अलगद खुणवतो.



नको वाटणारे आता, सगळच आवडतय.

नवीन दिसणारे सगळ, आपलच वाटतय.



आता झाल प्रेम, या प्रवासावर.

पल्ला गाठला मोठा, तूझ्या साहसावर.



दिसतोय आता शेवट, कदाचित दोघेही थांबणार.

श्वास मोठा घेऊन, पुन्हा दोघेच दरमजल चालणार.


Rate this content
Log in