STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

4  

akshata alias shubhada Tirodkar

Others

दोस्ती

दोस्ती

1 min
310

प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री ही असते

माझ्याही आयुष्यात माझी जिवाभावाची मैत्रीण आहे

आठवतो तो आजपण दिवस

जेव्हा होता आमच्या कॉलेजचा रिझल्ट

आमचं ठरलं होतं आदल्या दिवशी भेटू आपण सुटीच्या खूप दिवसांनी


दिवस उजाडला तो त्या क्षणी

उत्सुकता होती मला तिला भेटण्याची

लवकर पोहोचले मी कॉलेजच्या दारी

वाट बघून लावला फोन तिला

तर मिळाला मोबाइल तिचा स्वीच ऑफ त्यावेळी

रागात रिझल्ट घेऊन आले मी घरी


तिच्याशी कधीच नाही बोलणार ठरवलं मनाशी

ताट पुढ्यात होतं पण जेवण जात नव्हतं

आपली कसली ही मैत्री मन ह्या विचाराने खात होतं

तेवढ्यात माझा फोन वाजला

पहिलं तर तिच्या आईचा नंबर नजरेस पडला

माझ्याकडे विचारपूस केली फोनही तिचा लागत नाही

काही झालं तर नसेल ना तिच्या ह्या प्रश्नाने माझाही जीव घाबरला

तिला समजावत माझ्या अश्रूंची गंगा वाहिली


फोन ठेवून ती कुठे असेल ह्या विचाराने

तिच्या बद्दलचा रागही गेला काळजी मात्र लागून राहिली

अर्ध्या तासाने तिचा फोन आला

तिचा आवाज ऐकताच मनाची बेचैनी स्थिर झाली

तिचे कारण ऐकून वाटले उगीच आपण रागे भरले

झाले होते ट्रॅफिक जॅम त्यात तिच्या फोनच्या बॅटरीने घेतला होता विराम


तिची ख्यालीखुशाली मिळताच मन झाले समाधान

तो दिवस ठरला आमच्या मैत्रीच्या अतूट नात्याचा टर्निंग पॉईंट

सोबत नव्हतो आम्ही त्या दिवशी पण मनाने मात्र आमची मैत्री घट्ट झाली

दहा वर्षे झाली आमच्या मैत्रीला अजूनही तशीच आहे

होत नाही भेटणं पण व्हाट्सअपवर मेसेजिंग चालू आहे


Rate this content
Log in