दोस्त
दोस्त
1 min
419
सूर्य नको तारे नको
नको चंद्र नाही जमीन हवी ।
माझ्या हृदयात बसणारी
मित्राची मैत्री हवी।।
नको देव नको दुवा
नको शस्त्र हातात।
नेहमीच माझ्या मित्राचा
हात पाहिजे हातात।।
न काही बोलता समजतो
माझ्या मनातील भाव।
त्याचाच हृदयी असेल
माझ्या साठी प्रेमाचा भाव।।
मी तर तयार आहे
तुफानाचा सामना करण्यास।
बस मला एक जिगरी
दोस्त हवा साथ देण्यास।।
ही वाट खूप अवघड आहे
पार करण्या दोस्त हवा
जीवन सुंदर होण्या
मला एक हमसफर हवा।।
