STORYMIRROR

Rajashri Kamble

Others

3  

Rajashri Kamble

Others

दोष कुणाचा?

दोष कुणाचा?

1 min
190

सर्वच दोष देती पावसाला

म्हणे हाहाःकार याने केला 

पण त्याच्या परतीचा 

मार्ग कोणी बंद केला ? ||१||


एवढा पाऊस पडूनही 

पृथ्वी तहानलेलीच कशी ?

कधी होइल ही तृप्त ?

पाणी अडविले सर्वत्र ||२||


जाळे विणले सिमेंटचे 

पाणी जिरेल कुठुन ?

एवढ्याशा पावसाने नदी-नाले 

जाती तुडूंब भरून ||३||


वाट फुटेल जिकडे 

पाणी जाते हे वाहुन 

दोष देती निसर्गाला पण

कोण दोषी ह्या आपत्तीला ? ||४||


तप्त झाली ही धरणी 

तप्त झाले आसमंत 

हिम तोही लागला पिघळु 

बाधतिल सारे हळूहळू ||५||


आता तरी जाग मानवा

 करू नको छेडछाड 

निसर्गाच्या या चक्रात 

कर रक्षण धरेचे आता तरी जोमात ||६||


भिजू दे धरतीला 

पावसाच्या या प्रेमात 

देईल गारवा, ठेवेल सुखात, सार्‍या जगताला 


Rate this content
Log in