दोनशब्द प्रेमाचे
दोनशब्द प्रेमाचे
1 min
219
प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे
आहे काय प्रेमाशिवाय
दोन गोड शब्द प्रेमाचे
त्यातच जगण्याची लय
प्रेमाचा नसावा मत्सर
प्रेमात नसावा द्वेष
प्रेम कसेही व्यक्त होते
देश असो व परदेश
भिनते अगाध प्रेमाची धून
सरगम जीवनाची मिळते
काळजात प्रेम मुळे
पुढे पुढे जगावेसे वाटते