STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

दोन तासाचे अंधत्व..!

दोन तासाचे अंधत्व..!

1 min
383

दोन तासाचे अंधत्व

मी आज अनुभवले

रविराजा चष्म्याने

मला ऐनवेळी ताडले


दांडी तुटली चष्म्याची

रिपेरींगसाठी वाट धरली दुकानाची

चुकामुक झाली बाबा

आज बऱ्याच दिसांनी सांजेची


तरीपण तनामनात तूच देवा

आजची सांज समजून घे

अंधत्व काय असते 

ते तू जाणून घे


तू तेजाचा लोह गोल

तुला अंधत्वाची न्यूनता काय कळणार

वाटले बिनचष्म्याचा मी दिसता

नक्की मला पाहून आंधळा म्हणून हसणार


म्हणून देवा तोंड चुकवले

आणि रिपेरींगचे काम केले

तेवढ्यातच बघ ना

तुझे रे देवा जाणे झाले..!


Rate this content
Log in