STORYMIRROR

Nagesh Dhadve

Others

2  

Nagesh Dhadve

Others

दोन शब्द तुझ्यासाठी...

दोन शब्द तुझ्यासाठी...

1 min
2.6K


देवांचा देव तू
सर्वांचा गणराया
मिळे तुझे सुख
मिळे तुजी माया,

विघ्नंहर्ता नाव घेता
विघ्नंच दूर जावे
सुख पदरात टाकूनी
आनंद गगनात मावे

डोळ्यातले सुख तुझ्या
सुखात भरावे
आयुष्य तुझ्यातच राहुनी
तुझ्यातच रंगुनी रहावे

सुखाचा मायबाप तू  
गरिबांचा दाता
देवांचा देव तू
नाथांचा नाथा

नाव घ्यावे देवा तुझे
रूप उमजून जाई
स्वर्ग मिळो ना मिळो
क्षण तुझे उमजून राही

दोन शब्द तुझ्यासाठी 
लिहूनि मन भरावे
आयुष्य जगता जगता
तुझ्यातच मिसळून जावे.

-नागेश(ndd)


साहित्याला गुण द्या
लॉग इन