दोन घडीचे जीवन
दोन घडीचे जीवन
आदिवासींना उमगले,हा आहे वाट चुकलेला वाटसरू
ते म्हणाले,असू दे,तू नको काळजी करू-----
आपण होऊया मित्र एकमेकांचे
मदत करू,प्रश्न सोडवू समाज्याचे
तुझी भाषा आम्हाला ,आमची भाषा तुला कळत नाही
काही हरकत नाही,खुणेने काम सांगू एकमेकाला------
देवाचीच दिसते तशी इच्छा
आपण मिळून पृथ्वी वाचवू
प्रदूषण,भ्रष्टयाचाराने दबलेली पृथ्वी
आपण मित्रत्वाच्या धाग्याने मोकळी करू-----
तू तुझी बुद्धी चालव
आम्ही आमचं हत्यार चालवतो
पृथ्वीला या दुष्टचक्रातून वाचवूया
कुणाला नको दोष देऊया-----
मग पहा पृथ्वीवर पुन्हा रामराज्य अवतरेल
केला जर आपण प्रामाणिक प्रयत्न
एकमेकांच्या विश्वासाच्या ताकदीनं
भारतभूला पुन्हा सुजलाम-सुफलाम बनवू -------
