STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

दिव्यप्रकाश

दिव्यप्रकाश

1 min
355

दिव्यप्रकाशाच्या झोतात

हासत ,नाचत आली दिवाळी

घरदार स्वच्छ करूनी मी

दारी घालते ठिपक्यांची रांगोळी....

पणती जरीलावली दारी

मिणमिणती ही छोटी जरी

प्रकाश देते सर्व ठिकाणी

तिमिरातुनी तेजाकडे नेते खरी...,

दिवाळीला झाली सुरूवात

आनंदमयी वातावरण सगळीकडे

प्रातःकाली उठूनी दीप लाविले

दीपमाला खुलते चोहिकडे....,

गरीबाघरी नेवू ज्ञानमयी दिव्यप्रकाश

ज्ञानज्योतीने दिवा लावू ज्ञानाचा

पणती पणती पेटवू अंगणी त्यांच्या

प्रकाशमान करूया सण दिवाळीचा.....

आप्तजनांना भेटी देवूनी

निभवू जन्मांतरीची ही नाती

सौख्याचे ,मांगल्याचे दीप लावूया

सगे,सोयरे आपले आनंदात राहती....


साहित्याला गुण द्या
लॉग इन