दिवस
दिवस
दिवस दिवसाचा असतो
माणसाने केलेल्या
कर्माचा असतो!
झुंजूमुंजुला उजाडणाऱ्या
पहाटेचा असतो!
अन् मावळतीला उधळणाऱ्या
गुलालाचाही असतो!!
चिव-चिवाट करणाऱ्या
चिमण्यांचाही असतो!
अन् कुहू-कुहू करणाऱ्या
कोकिळेचाही असतो!!
होत्याचे नव्हते करणाऱ्या
भूकंपाचा असतो!
अन् त्सुनामीने उठणाऱ्या
लाटांचाही असतो!!
दिवस मरणाऱ्या
माणसांचाही असतो!
अन् गोड जेवणं करुन
विसावणाऱ्या माणसांचाही असतो!!