दिवस उरले नाहीत आता...
दिवस उरले नाहीत आता...

1 min

11.8K
बेछूद स्वप्ने माळून फिरण्याचे
दिवस उरले नाहीत आता
या हिरव्या प्रदेशात फिरण्याचे
दिवस उरले नाहीत आता
कालचाच गजरा तू घालून आलीस
समोर होतीस तेव्हा सांगणार होतो
राणी या टपोऱ्या फुलांना कालचे
रंगच उरले नाहीत आत्ता
किती धुंद होती तुला शोधण्यात
तुझ्यासाठी तगमगण्यात
तू इतक्या जवळ आलीस की तेही
दिवस उरले नाहीत आता
पोटाचे नव्हतेच भान देहाचा रंगीन
उत्सव साजरा करताना
आता कळून चुकले देहाचे
दिवस उरले नाहीत आता