STORYMIRROR

Mrudula Raje

Others

3  

Mrudula Raje

Others

दिवस श्रावणाचा

दिवस श्रावणाचा

1 min
225

दिवस श्रावणाचा । हा धुंद पावसाचा ।

मदमत्त यौवनातील । मधुगंध शिंपण्याचा ॥


धारा सचैल न्हाती । फुलती उरात मोती ।

पखरण केसराची । अन् गंध पारिजाती ॥


वारा खट्याळ आणि । ही लाट सुवासाची ।

सोडविता सोडवेना । ती साथ चंपकाची ॥


कांती नवी नव्हाळी । दे याद केतकीची ।

काटा उरात सलतो । नच साथ प्रियकराची ॥


ये अधीर प्रियकरा तू । मीही तृषार्तलेली ।

फुलवू फिरून संध्या । श्रावणघन पावसाळी ॥


Rate this content
Log in