STORYMIRROR

Umakant Kale

Others

4  

Umakant Kale

Others

दिवस एक.असा कसा गुंफु

दिवस एक.असा कसा गुंफु

1 min
507

एका दिवसात कसे

रेखाटू मैत्री आपली.

भावनिक क्षणाची साथ

शब्द मग माझे कमी पडती..

सूर्य जसा रोज नित्य नियमाने

निरंतर उगवत गेला ..

तसाच माझा सूर्य रुपी मित्र

माझ्या शिवाय कुठे रोज उगवला..

देऊन दारवर दस्तक 

बघ तुझा सुदाम रे 

कृष्णा तुझ्या दारी आला..

जणू रोज माझ्या हाकेला

उठून मग तो धावला..

नाही कुठे जाणवली रिक्त जागा

आमच्या रंगात आम्ही रंगलो

नाही नटला चटणी भाकर खाण्यास

मित्र तो माझा नेहमीच असा वागला

दिवसभर जोडी आमची

गीत ते ,दोस्ती ना तुटायची आपली..

आयुष्याच्या गर्दीत तो कुठे 

आणि मी कुठे , 

पण बालपणाची ती खोडकर मैत्री

आजही त्याच्या मनात जिवंत आहे.

त्याच्या भावनाचा स्पर्श 

माझ्यात हि आहे..



Rate this content
Log in