STORYMIRROR

Pratima Kale

Others

3  

Pratima Kale

Others

दिवाळीची हो चाहूल

दिवाळीची हो चाहूल

1 min
387

रात बहरे थंडीने

ऋतू पालटता छान

दिवाळीची हो चाहूल

जीवनात वाटे शान ||१||


धुके पडते पहाटे

गार गार सुटे वारा

रजईत आनंदाने

घेवू शेकोटी पहारा ||२||


पेटा अंगणी शेकोटी

वाटे पहा उबदार

संगे चहाचा आस्वाद

रंग हो बहारदार ||३||


भूक लागे कडाडून

रात बहरे थंडीने

ऊर्जा,चैतन्य लाभेल

खास हो सुका मेव्याने ||४||


सुट्या पडता शाळेला

मजा किल्ला करण्यात

आवडीचा खेळ रंगे

भर पडे उत्साहात ||५||


Rate this content
Log in