Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shobha Sanjay Bavdhankar

Others

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

दिवाळीचा फराळ

दिवाळीचा फराळ

1 min
343


अभ्यंगस्नानाची आली पहाट  

स्नान होताच दिसले फराळाचे ताट  


लाडू मोतीचुर, राघवदास 

खुशालचेंडू गरगरीत दिसता झकास 


बेसन लाडू, रवा लाडू शेजारी शेजारी बसले  

आजी आजोबा खुदकन हसले  


मुरड घालून चंद्रकोर जशी करंजी उभी  

वेगळा तिचा दिमाख थाट 

गाल फुगवुन बसलेल्या पुरीची बघत होती वाट 


नट्टापट्टा तोरा, गुळ साखरेचे बाकर 

टम्म भरलेले दोघींचे पोट


चिल्लर कंपनीने चोरुन मारला ताव 

आईला पाहुन पुसले ओठ 


अनारश्याचा तोरा वेगळा 

खसखस लावुन थयथयाट सगळा  


टपोर्‍या शंकरपाळ्याने मारली चहात दडी 

कशीबशी शिल्लक राहिली नारळाची वडी  


गोड खाऊन आला वीट  

चकली, चिवडा आले डब्यातुन बाहेर नीट 


गप्पा मारत, बकाणे भरत सगळं झालं फस्त 

आहा दिवाळीचा फराळ काय मस्त मस्त ॥ 


. . . . फराळाला नक्की या !


Rate this content
Log in