दिवाळी
दिवाळी
1 min
438
करू आरास दिव्यांची,
दिवाळीचा सण आला..
रोषणाई पणत्यांची,
लाभो सुख सौभाग्याला...!!१!!
वसु बारसेच्या दिनी,
पूजा गाय वासराची..
गोडा धोडाचा नैवेद्य,
चव मुक्या भावनांची...!!२!!
सुख समृध्दीच्या दारा,
लक्ष्मी आली नांदायला,
भाग्य लाभले या घरा,
दैव वेगळे जाणायला...!!३!!
लेकी आल्या माहेराला,
आस लागली भेटीची..
आई वडिलांनी भरली,
ओटी खणा नारळाची...!!४!!
भाऊ बहिणीचे प्रेम
जणू जीव हा गुंतला..
भाऊबीज पूजनाचा,
सण साजरा गाजला...!!५!!
