STORYMIRROR

Laxman shinde

Others

3  

Laxman shinde

Others

दिवाळी

दिवाळी

1 min
317

सण आला दिवाळीचा 

आनंदाने साजरा करा

गरिबाला फराळ वाटून

त्यांच्या घरी आनंद भरा


आतषबाजी करा तुम्ही 

लक्ष असू द्या निसर्गावर

प्रदूषण मुक्त दिवाळी

बंधन असू द्या सर्वांवर


दीप लावा घरासमोर 

उजळू द्या अंगण सारे

अंधारलेल्या घरामध्ये 

जाऊद्या प्रकाशाचे किनारे


फळ मिळते कष्टाचे 

लक्ष्मीचे पूजन करा

थ्येय ठेवा उंचीचे 

अपार तुम्ही कष्ट करा


सण दिवाळी पाडव्याचा 

नवनिर्माण करण्याचा

एक पाऊल ठेवा तुम्ही

ध्यास घ्या नवनिर्मितीचा


भाऊबीज येते दिवाळीला

भाऊ-बहिणीच अतूट नाते

होऊ द्या भेट बहीण भावाची

आठवून सारे नाते-गोते


Rate this content
Log in