दिवाळी
दिवाळी
1 min
374
सण आला मोठा
नाव त्याचे दिवाळी
पाच दिवस उठायचे
लवकरच सकाळी
उटणे लावू अंगाला
करु अभ्यंग स्नान
सुगंधी साबणाचा
वास किती छान
पणत्यांना रंगवूया
सुशोभित करुया
रांगोळी काढून
अंगण सजवुया
मातीचे किल्ल्याची
बांधणी मस्त करुया
शिवबाच्या किल्ल्यास
कल्पनेने सजवूया
मित्रांना आपल्या
फराळाला बोलवु
प्रदूषणाचे भान ठेवू
फटाके थोडेच उडवू
दिवाळीच्या सुट्टीत
फिरायला जावूया
दिवाळीचा अभ्यास
वेळ मिळताच करुया!!!!
