STORYMIRROR

Chandanlal Bisen

Others

3  

Chandanlal Bisen

Others

दिवाळी

दिवाळी

1 min
349

आली आली दिवाळी सोन पावली

पावली काळ्याकुट्ट अंधारातली

अंधारातली प्रखर पुंजरूपी

पुंजरूपी तेजोमय प्रगटली


आनंदाची पर्वणी, मने प्रसन्न

प्रसन्न संपूर्णतः वातावरण

वातावरण चैतन्य सुगंधित

सुगंधित वृक्षवल्लीची सुमन


चहूकडे स्वच्छता रांगोळी नक्षी

नक्षी भुरळ घाली तवमनासी

मनासी प्रेरित करी दिपज्योत

ज्योतीने समस्त मातृभू प्रकाशी


घरोंघरी नाना फरार व्यंजन

व्यंजन आस्वाद घेती सर्वजण

सर्वजण नववस्त्रासमवेत

नववस्त्रासमवेत दीप सण


Rate this content
Log in