STORYMIRROR

Pandit Nimbalkar

Others

4  

Pandit Nimbalkar

Others

दिवाळी

दिवाळी

1 min
243

सण दिवाळी आला 

मनी आनंद फार झाला

भाऊबीजेची ओवाळणी

सुखी ठेव देवा भावाला ||१||


सडा घालून अंगणी 

रंग भरले रांगोळीत

झेंडूच्या फुलांचे तोरण 

दिवा शोभतो तुळशीबागेत ||२||


नवे कपडे घालून मुले 

फटाके मौजेने वाजवती

लाडू, चकल्या, फराळ 

सवंगडी एकत्र चाखती ||३||


गजबजून गेली नाती 

एकमेका सुखदुःख सांगती 

दिवा जोडला मनात नवा 

अशी दिवाळीची महती ||४||


Rate this content
Log in