दिवाळी
दिवाळी
1 min
183
असा गुलाबी थंडीचा माहूल,
तशी दिवाळी सणाची चाहूल
लवकर उठून घाई आंघोळीची,
तयारी यांची फटाके फोडायची
नेहमीच येतो सण दिवाळी,
आईही गायी म्हशी ओवाळी
कामात व्यस्त सदाच आई
फराळ बनवायची तिलाच घाई
लाडू करंजी शेव चकली,
यातलं काहीच नसतं नकली
शंकरपाळ्या अन अनारसे,
लक्ष्मी पूजनास सारेच साजेसे
भावासाठी तयारी बहिणीची,
लगबग सुरु कशी भाऊबीजेची
गोड खावून येता कंटाळा,
म्हणे आता थालीपीठ वळा
