दिवाळी येऊन गेली
दिवाळी येऊन गेली
1 min
418
चेहऱ्यावरचे तेज
गालावरचं हसू
डोळयामधली चमक
हळूच सांगून गेली की
दिवाळी..... आताच येऊन गेली.....
लाडवांचा गोडवा
करंज्याचा स्वाद
आणि चकल्यांची चव
जिभेवर ठेऊन गेली
दिवाळी... आताच येऊन गेली.....
शरिराचा शीण
डोक्यावरचा ताण
आणि मनावरची जळमटं
दूर घेऊन गेली
दिवाळी... आताच येऊन गेली.....
