दिवाळी फराळ
दिवाळी फराळ
*आली आली दिवाळी*
*फराळाची लगबग सुरू झाली*
*निवांत छान पदार्थ करायचे*
*सामानाची यादी वाण्याकडे जमा केली*...
*आले सामान छान घरपोहोच*
*पहिले काय करावे याचा विचार केला*
*करू म्हटलं गोडापासून सुरूवात*
*मस्त लाडू वळण्याचा बेत झाला*...
*रवा घेतला मस्त भाजायला*
*पिठी साखर तयार करून घेतली*
*सुकामेवा बारीक करून घेतला*
*सारे एकत्र करून लाडूंची रास लावली*....
*गोड,खारे शंकरपाळीचे भिजवले*
*मस्त पीठ झाल्यावर शंकरपाळे लाटले*
*मंद आचेवर खुसखुशीत तळले*
*थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवले,*.....
*अनारश्याचेही पीठ तयार करून घेतले*
*खसखस घेवून त्यावर गोल थापले*
*मस्त लालासर कुरकुरीत तळले*
*सजनाला बाई भारीच ते आवडले*....
*गोल गोल काटेरी चक चक चकली*
*चवीला तिखट,दिसायला देखणी*
*सर्वांच्याचअत्यंत आवडिची आहे*
*दिवाळ फराळातील ही लावण्यखणी*....
*करंजीचे पोट गोड सारणाने भरले*
*अदा करंजीची फारच ह भारी*
*दिसते देखणी पण कधीही फसवेल*
*सादळू नये म्हणजे जमलं ह पदार्थ सारी...*
