STORYMIRROR

Pratima Kale

Others

4  

Pratima Kale

Others

दिवाळी पहाट*

दिवाळी पहाट*

1 min
379

आली आली दिपावली

सोन पावलांनी दारी

उल्हासाने अलगद

आली पाहुण्यांची स्वारी ||१|| 


सर्वांसाठी गोड गोड

फराळाची करे घाई

आई प्रेमाने ,मायेने

मदतीला घेई ताई ||२||


अंगणात टाकू सडा

दारी सुंदर रांगोळी

झेंडू,आम्र डहाळीचे

सजे तोरणे आगळी ||३||


करू उत्सव साजरा

गरीबास मदतीने 

दान ज्ञानाचे अर्पुन

माणुसकी जागृतीने ||४||


संवर्धन निसर्गाचे

आरोग्याचा जपा मंत्र

टाळा फटाके फोडणे

नव जीवनाचे तंत्र ||५||


प्राजक्ताच्या सुगंधाने

आली दिवाळी पहाट

आनंदाने घरोघरी

चाले एकोप्याचा थाट ||६||


Rate this content
Log in