दिवा.......
दिवा.......
दिवा सर्वांना असतो हवा हवा
हवा येताच विजून जातो केव्हा केव्हा
अंधार नष्ट करायला साथ देतो दिवा
म्हणून अंधार करतो दिव्याचा हेवा
दिव्याला जाळायला नेहमी साथ देते राई
तेल वात आणि पणती ताई .....
दिवा लावता तुळशी पाशी
उजिळ पळतो देवा पाशी
अशी आजी म्हणते माझी
दिवा लावता माझ्या घरी
दुःख पळून जाते दारी
दिवाळी मध्ये दिवे लावतात खूप सारी
म्हणूनच सर्व गाव दिसते भारी....
लाईट जाते रात्रीच्या वेळी
दिवे लावताच मुले वाजवतात टाळी
एका दिव्यावर शंभर दिवे पेटली
तेव्हा दिवाळीत सर्व माळी सजली
आज विजला जरी दिवा
उद्या नव्याने पेटतो हाच दिवा
दुःखात पण दिवाच जळला
सुखात पण दिवाच पेटला .....
