STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

दिवा

दिवा

1 min
603

एक इवलासा दिवा 

लख्ख तयाचा प्रकाश  

मंगल समयी लाऊन दिवा शुभ कार्यास होते सुरुवात 


उजेड पसरूनी सर्वत्र 

अंधारावर करतो मात

आयुष्याच्या चढ- उतारातही कसं प्रकाशित व्हायचं 

ही हिंमत आहे त्यात 

 

करत नाही घाई 

जळत राहतो निवांत 

प्रकाश त्याचा भावतो मनी तो जळतो असा शांत


 इवल्याशा दिव्याची 

मोठी एक सावली 

सावलीत लपलेल्या असतात कित्येक आकृती 


कधीकधी उलगडतो गुढकथा लपलेली 

कधी वाटते ती सत्य तर कधी उगाच रंगवलेली  

 

स्वतः जळून दुसऱ्याला देतो

 प्रकाश 

आपलं सर्वस्व झोकून नेहमी जळतच राहतो सावकाश 

ना कसला अहंकार दिसतो त्यात फक्त परोपकार 


दिव्याकडे बघून 

वाटे मनास

 प्रत्येकाने तेवत ठेवावा एक दिवा आपल्या आत

 त्यात माणुसकीचे तेल व वात्सल्याची असावी वात 

 कुविचारांचा अंधकार नाहीसा होऊन सुविचारांचा प्रकाश दिसेल मग सर्वात...


Rate this content
Log in