दिशाहीन
दिशाहीन
1 min
154
तुझे हे अवेळी बरसणे
स्पर्धा करु पहातेय
माझ्या आसवाशी
रक्ताचे नाते विसरुन
दिवाहीन नौकेसम
वाहतेय मी
त्या खवळलेल्या दर्यात
तो ध्येयरुपी ध्रुवताराही
पारखा झालाय मला
जवळच्या नातलगांप्रमाणेच
कारण ...
कारण, मी लढा पुकारलाय
असत्या विरुद्ध
प्रवाहाला विरोध करणारी मी
आता मात्र बनू पहातेय
प्रवाहपतित दीनवाणी
असहाय्यपणे...
