STORYMIRROR

कवी सुभद्रासुत- सं.बा.आंधळे

Others

4  

कवी सुभद्रासुत- सं.बा.आंधळे

Others

दिशा विचारांची

दिशा विचारांची

1 min
454

वैचारिक हवी गोडी

सकारात्मकता वास।

अधिनता पाळल्याने

सुख शांती सहवास॥१॥


नकारात्मक दृष्टीकोन

ईच्छाशक्ती खालावतो।

आशावादी उमंगाची

ज्योत सुद्धा मालावतो॥२॥


आशा ईच्छा सकारण्या

हवा मनाचा निर्धार।

जीवणाच्या सुखासाठी

मन प्रेरणा आधार॥३॥ 


व्यक्तीमत्व मोठेपणा

विचारात साकारतो।

प्रामाणिक स्वाभिमान

विश्वासाला पुकारतो॥४॥


मन अचार विचार

यांच्या रहावं आधिन।

होतं हसत खेळत

सुख आपल्या स्वाधीन॥५॥


Rate this content
Log in