STORYMIRROR

Sanjay Jadhav

Others

3  

Sanjay Jadhav

Others

दिशा हसतसे गंधाने

दिशा हसतसे गंधाने

1 min
295

दरवळे हा चाफा

पसरे सारा सुगंधाने 

मनमाझे मोहरे

दिशा हसतसे गंधाने


रातराणीचा गंध

पसरे रात्रीला चौफेर

होती भुजंग दंग

पाहून फुलांचा बहर


मधुमालती फुले

दिशा हसतसे गंधाने

झुबके छान छान

बहरली सारी उद्याने


जाई, जुई, शेवंती,

मोगरा, रानचाफा सारी

फुलली उद्यानात

फुलपाखरे येती न्यारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन