STORYMIRROR

Sangita Pawar

Others

3  

Sangita Pawar

Others

दिसे बहिणाबाई

दिसे बहिणाबाई

1 min
241

पूर्वीचीही रीत

बालपणी लग्न

करूनी कामेही

संसारात मग्न ||१||


दळण दळते

पूर्वीच्याही काळी

हाती बांगड्याही

शोभे कुंकू भाळी ||२||


छानही हिरवी

नेसे नववारी

दृष्टही काढूनी

मिरची मोहरी ||३||


दळण दळाया

घालुनिया मांडी

घर- घर - फिरे

खाली पीठ सांडी ||४||


खुंटा धरुनिया

फिरवते ताई

शोभुनीही दिसे

 या बहिणाबाई ||५||


Rate this content
Log in